ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेडरुम हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मनाला शांतता आणि शरिराला आराम मिळतो. प्रत्येकाला आपल्या रुममध्ये मी टाईम स्पेंड करायचा असतो.
आजकाल घरांमध्ये बेडरूम लहान असतात आणि त्या काही मोजक्या फर्निचरच्या वस्तूंनीच भरून जातात. लोकांना आपल्या आवडीनुसार बेडरूमची सजावट करता येत नाही.
लहान बेडरूम सजवण्यासाठी अनेक लहान आणि सुंदर सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या खोलीला सजवण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.
जर तुमचे बेडरुम लहान असेल, तर स्टोरेज असलेला बेड निवडा. तुम्ही थोडे अधिक स्टायलिश हेडबोर्ड असलेली बेड देखील निवडू शकता. हा दिसायला चांगला दिसेल आणि झोपल्यावर आरामदायीही वाटेल.
जर बेडरुम लहान असेल, तर तुम्ही बेडच्या वरच्या भिंतीवर एक सुंदर पेंटिंग किंवा कपल्सचा फोटो लावू शकता.
जर बेडशेजारी साइड टेबलसाठी जागा असेल, तर ड्रॉवरमधील वस्तू आणि वरच्या बाजूला एक कुंडी किंवा लॅंप ठेवून टेबल सजवा.
तुमच्या बेडरूमच्या भिंती आणि फर्निचरच्या रंगाशी जुळणारे पडदे निवडा. योग्य रंगाचे पडदे बेडरूमचा लूक वाढवतील.
जर बेडरूममध्ये बाजूला जागा असेल, तर तिथे एक लॅंप किंवा इंडोर प्लांट्स लावा. यामुळे बेडरूममध्ये ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहील.
लहान बेडरूममध्ये खूप भडक दिवे वापरणे टाळावे. ते डोळ्यांना त्रासदायक ठरतील. नेहमी मध्यम टोनचे दिवे निवडावे.