Saam Tv
दिवसभरात प्रत्येकाला सकाळ, संध्याकाळी चहा हमखास लागतो आणि आपण चहा पिऊन झाल्यावर चहापत्ती फेकून देतो.
परंतु या गाळलेल्या चहापत्तीचे अनेक फायदे असून याचा वापर त्वचा उजळवण्यापासून घराची सफाई करण्यापर्यंत करता येतो.
सगळ्यात आधी वापरली गेलेली चहापत्ती स्वच्छ धुवुन घ्या, त्यात साखर राहता कामा नये. नाहीतर चिकटपणा निर्माण होईल.
नंतर एका भांड्यात पाणी घेऊन चहापत्ती एकरंग होईपर्यंत उकळू द्यावी. नंतर थंड करून स्प्रे बॉटलमध्ये भरावी.
तयार चहापत्तीचे पाणी घाणेरड्या काचेवर, फेस ग्लास किंवा खिडक्यांवर फवारा. स्वच्छ सुती कापडाने किंवा वर्तमानपत्राने पुसून घ्या.काच अगदी नव्यासारखी चमकेल.
चहापत्तीमध्ये टॅंनिंग अॅसिड असल्याने जुन्या लाकडी फर्निचरवर फवारल्यास फर्निचरवर चमक येईल.
किचन सिंक किंवा बाथरूमच्या टाइल्सवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी त्यावर चहापत्तीचे पाणी फवारा आणि 10 मिनिटे सुकुवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.