Saam Tv
जसजस वय वाढत जातं तसे चेहऱ्यावरचे तेज गायब होते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. परंतु आजकाल वाढता तणाव, धूळ, कमी झोप यामुळे चेहऱ्यावर ऐन तारूण्यात सुरकुत्या, फाइन लाईन्स दिसू लागल्या आहेत.
यावर उपाय म्हणून वेगवेगळे स्कीन केअर प्रोडक्टस आपण वापरत असतो. पण इतके पैसे खर्च करूनही हवा तसा ग्लो चेहऱ्यावर येतच नाही .
पण काळजी नको, घरगुती तयार केलेल्या या अॅलोवेरा जेलने काही क्षणांतच नितळ त्वचा मिळवता येते त्यासाठी अस तयार करा घरगुती अॅलोवेरा कोलेजन जेल.
प्रथम कोरफडीची पाने स्वच्छ धुवा, साल काढून आतील गर काढा. खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई आणि गुलाबजल घालून एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा.
दुसऱ्या वाटीत कोमट पाण्यात जिलेटीन विरघळू द्या. विरघळलेले जिलेटीलन कोरफडच्या मिश्रणात टाकून व्यवस्थित ब्लेंड करा.
ते मिश्रण एका हवाबंद डब्ब्यात ठेवून आपण आठवडाभर वापरू शकतो.
कोरफमुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी वाटते. कोरफड लावल्याने कोरडेपणा कमी होतो तसेच त्वचेची लवचिकता टिकून राहते
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.