Kitchen Hacks : फ्रीजरमध्ये बर्फाचा जाड थर साचलाय? 'या' ३ सोप्या पद्धतींनी मिनिटांत करा डीफ्रॉस्ट

Saam Tv

फ्रीजरमध्ये साचलाय बर्फाचा डोंगर?

मेकॅनिकशिवाय मिनिटांत बर्फ घालवण्याचे ३ सोपे उपाय जाणून घ्या.

How to defrost fridge quickly | PINTEREST

कुलिंग कमी आणि विजेचे बिल जास्त

फ्रीजरमध्ये बर्फाचा जाड थर साचल्याने सामान ठेवायला जागा उरत नाही. यामुळे फ्रिजच्या कूलिंगवर वाईट परिणाम होतो आणि विजेचा वापरही वाढतो.

How to defrost fridge quickly | PINTEREST

बर्फ साचण्याचे मुख्य कारण काय?

फ्रिजचे दार वारंवार उघडल्याने बाहेरील ओलसर हवा आत जाते. दरवाजाची रबर सील ढिली असणे किंवा दार व्यवस्थित बंद न झाल्याने बर्फाचा थर साचतो.

How to defrost fridge quickly | PINTEREST

फ्रिज बंद करून बर्फ वितळू द्या

मुख्य प्लग काढून फ्रीजरचे दार उघडे ठेवा आणि खाली टॉवेल अंथरा. बर्फ सैल झाल्यावर प्लास्टिकच्या स्पॅटुलाने हळूहळू काढून घ्या. सुरी किंवा कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका

How to defrost fridge quickly | PINTEREST

गरम पाण्याच्या वाफेने बर्फ वितळवा

प्लग काढल्यानंतर एका भांड्यात गरम पाणी भरून फ्रीजरमध्ये ठेवा. वाफेमुळे बर्फ पटकन मऊ होऊन सैल पडेल. उकळते पाणी किंवा धातूचे भांडे थेट ठेवणे टाळा.

How to defrost fridge quickly | PINTEREST

टेबल फॅनच्या हवेचा वापर

फ्रिज बंद करून फ्रीजरचे दार उघडे ठेवा. टेबल फॅनची हवा थेट फ्रीजरच्या दिशेने लावा. यामुळे खरवडून न काढता बर्फ हळूहळू आपोआप वितळेल.

How to defrost fridge quickly | PINTEREST

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • बर्फ वितळल्यानंतर आतील भाग सुक्या कपड्याने नीट पुसून घ्या.

  • फ्रीजरचे योग्य तापमान -18°C आणि फ्रिजचे 4°C ठेवावे.

  • फ्रिज पूर्ण थंड झाल्यावरच सामान आत ठेवा.

How to defrost fridge quickly | PINTEREST

वारंवार बर्फ साचत असल्यास...

दरवाजाची रबर सील तपासा, ती ढिली असल्यास बदला. फ्रॉस्ट-फ्री फ्रिजमध्येही बर्फ साचत असल्यास डीफ्रॉस्ट सिस्टीम मेकॅनिककडून तपासून घ्या.

How to defrost fridge quickly | PINTEREST

NEXT : बनवा पेरूचे चमचमीत लोणचे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Guava Pickle | SAAM TV
येथे क्लिक करा