फक्त १० मिनिटांत बनवा चपातीचा कुरकुरीत काला; खाणारे बोट चाटत राहतील

Siddhi Hande

चपाती-भाजी

चपाती खायचा अनेकांना कंटाळा होतो. लहान मुलेदेखील चपाती भाजी खाण्याचा कंटाळा करतात.

Crispy Chapati Recipe | Google

चपातीचा कुरकुरीत काला

तुम्ही चपातीचा कुरकुरीत काला बनवू शकतात. हा काला खूप चविष्ट आणि कुरकुरीत असतो.

Crispy Chapati Recipe | Google

चपाती बारीक करुन घ्या

सर्वप्रथम चपातीचे बारीक तुकडे करुन घ्या. तुम्ही मिक्सरलादेखील चपाती बारीक करु शकतात.

Crispy Chapati Recipe | Google

चपाती

या चपातीचे पीठ होणार नाही, याची काळजी घ्या.यानंतर कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक कापून घ्या.

Crispy Chapati Recipe | Google

फोडणी द्या

गॅसवर कढईत तेल टाकून तापायला ठेवा. त्यानंतर तेलात मोहरी टाका.

Crispy Chapati Recipe | Google

कांदा परतून घ्या

यानंतर तेलात कांदा, मिरची टाकून मस्त परतून घ्या.

Crispy Chapati Recipe | Google

मसाले टाका

यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, घरगुती मसाला टाकून मस्त परतून घ्या.

Crispy Chapati Recipe | Google

चपातीचे तुकडे परतून घ्या

यानंतर त्यात चपातीचे बारीक केलेले तुकडे टाकून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

Crispy Chapati Recipe | Google

चपातीचा काला

यानंतर या चपातीवर वरुन कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करा. हा चपातीचा काला चवीला खूप मस्त लागतो.

Crispy Chapati Recipe | Google

Next:  घरी नाश्त्याला बनवा फक्त १० मिनिटांत कुरकुरीत कटलेट; तोंडाला पाणी सुटेल

Cutlet Recipe | Google
येथे क्लिक करा