Bharat Jadhav
भारतात होळीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. परंतु काही गावं आहेत तेथे होलिका दहन केले जात नाही.
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात असलेलं हातखोह गाव. यात गेल्या 400 वर्षांपासून होलिका दहन केले जात नाही.
400 वर्षांपूर्वी जेव्हा गावात होलिका जाळली गेली तेव्हा एक मोठी आग लागली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर जळून खाक झाला होता.
उत्तर प्रदेशातील बार्सी गावातही होलिका दहन होत नाही. होलिका दहन झाले तर महादेवाचे पाय जळतात. असा समज लोकांच्या मनात आहे.
बार्सी गावात एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे महाभारत काळातील असल्याचे सांगितलं जातं.
राजस्थानमधील हरणी गावात गेल्या 70 वर्षांपासून होलिका दहन झालेले नाही.
छत्तीसगडमधील गोंडपंद्री गावातदेखील शतकानुशतके होलिका दहन झालेले नाहीये.
झाशीजवळील एरूच शहर हे हिरण्यकश्यपाचे स्थान मानलं जातं. एरुचमध्ये होलिकाची चिता ज्या अग्नीकुंडात जाळली गेली होती ती अस्तित्वात आहे.