Shruti Vilas Kadam
होळी म्हणजे होलिकादहन. नारळ फोडणे हे अहंकार, वाईट विचार आणि नकारात्मकतेचा नाश दर्शवते.
पुराणकथेनुसार भक्त प्रह्लादाचा विजय आणि होलिकेचा नाश याची आठवण म्हणून होळी साजरी केली जाते. नारळ फोडणे हे शुद्ध भक्तीचे प्रतीक मानले जाते.
हिंदू संस्कृतीत नारळाला ‘श्रीफळ’ म्हणतात. कोणतेही शुभ कार्य नारळ फोडून सुरू केले जाते.
नारळाचा कठीण कवच म्हणजे अहंकार, तर आतला पांढरा गर म्हणजे शुद्ध मन. होळीला नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग.
होळीच्या आगीत नारळ अर्पण केल्याने घरातील दोष, वाईट शक्ती व नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
वैदिक व पुराणकालापासून अग्नीपूजा आणि होम-हवनाची परंपरा आहे. त्यातूनच होलिकादहनात नारळ अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली.
होळीला नारळ फोडल्याने घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदतो, असा विश्वास आहे.