ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
होळीच्या वेळी लोकांना रंगांशी खेळायला आवडते. रासायनिक रंग लावण्यापूर्वी, योग्यरित्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते.
सेंसेटिव्ह त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण ती लगेचच खराब होण्याची शक्यता असते.
जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर, होळी म्हणजेच रंग खेळण्याआधीच चेहऱ्याची काळजी घ्या.
रंग खेळण्यापूर्वी सेंसेटिव्ह त्वचेची तेलाने मालिश करा. नारळ किंवा ऑलिव्ह तेलाने मालिश करावी.
जर तुम्ही उन्हात होळी खेळणार असाल तर सनस्क्रीन जरुर लावा. हे तुमच्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण करेल.
त्वचेला तेल लावण्याऐवजी तुम्ही मॉइश्चरायझरने मसाज करु शकता. यामुळे रंग त्वचेला नुकसान पोहचवणार नाही.
ओठांचे संरक्षण करण्यसाठी त्यांना पेट्रोलियम जेल लावा.
होळी खेळून झाल्यानंतर त्वचेला स्वच्छ करण्यासाठी घासू नका. हलक्या हाताने स्वच्छ करा.
त्वचेवरुन रंग काढून टाकल्यानंतर सीरम लावा. यामुळे रंगाचे कोणतेचे नुकसान होणार नाही.