Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Shreya Maskar

नारळाचे तेल

होळीच्या रंगांमुळे त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी रंग खेळायला जाण्याआधी त्वचेला चांगले नारळाचे तेल लावा. तेल लावल्याने त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो. ज्यामुळे रंग थेट त्वचेला लागत नाही.

Coconut oil | yandex

तेलाचे प्रकार

तुम्ही त्वचेला नारळाचे, बदामाचे आणि तीळाचे तेल लावू शकता. तसेच रंग खेळताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या. गॉगलचा वापर करा.

oil | yandex

हायड्रेट त्वचा

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तसेच चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून रंगांमुळे त्वचा कोरडी पडणार नाही. विशेषतः कोपर, गुडघे आणि पायांना चांगले मॉइश्चरायझ करा.

Hydrate skin | yandex

ओठांची काळजी

रंगांपासून ओठांची विशेष काळजी घ्या. त्यामुळे ओठांना लिप बाम किंवा तूप लावा. हे होळीच्या रंगांपासून ओठांच्या त्वचेचे संरक्षण करते.

Lips care | yandex

चेहरा धुवा

होळीला रंग खेळून आल्यावर त्वरित आंघोळ करून शरीरावरील सर्व रंग काढून टाका. रंगीत त्वचेवर जास्त वेळ बसणे टाळा. यामुळे रंग त्वचेला चिकटून राहतो. तसेच संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

face wash | yandex

फेस पॅक

बाऊलमध्ये बेसन, दही, गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि १०-१५ मिनिटे फेसपॅक तसाच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझ करा. ज्यामुळे त्वचेवरील रंग सहज निघून जातील आणि ती उजळ होईल.

Face pack | yandex

सनस्क्रीन

होळी खेळायला जाताना आवर्जून सनस्क्रीन लावा. उन्हात चेहरा काळा पडणार नाही. तसेच रंगांपासूनही सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे संरक्षण करेल.

Sunscreen | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

disclaimer | yandex

NEXT : हार्ट अटॅक येण्याआधीच व्हा सावध; घरच्याघरी करा 'या' ३ टेस्ट, २ मिनिटांत Heart हेल्थ समजेल

heart attack | yandex
येथे क्लिक करा...