Shreya Maskar
पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी बेसन, तूप, दूध, साखर, गूळ, वेलची, जायफळ इत्यादी साहित्य लागते.
पुरणपोळीची कणीक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मैदा, पाणी, मीठ इत्यादी साहित्य लागते.
पुरणपोळीची कणीक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि पाणी घालून मळून घ्या.
पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी बेसन साजूक तुपामध्ये चांगले भाजा.
यात दूध, गूळ, साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या.
कणिकेच्या गोळ्याची पारी करून त्यात बेसनचे सारण भरून घ्या.
पुरणपोळी तुपात खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
कटाच्या आमटीसोबत पुरणपोळीचा आस्वाद घ्या.