Shreya Maskar
बाजारात मिळते तशी जिलेबी तुम्ही घरीच सिंपल पद्धतीने बनवू शकता.
जिलेबी बनवण्यासाठी मैदा, केशरी रंग, बेकिंग पावडर, दही, कॉर्नफ्लोअर , पाणी, तूप, केशर, साखर आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा मिक्स करून घ्या.
यात आता पाणी आणि दही टाकून छान ढवळून घ्या.
पुढे या मिश्रणात केशरी रंग आणि केशर टाका.
दुसरीकडे पाक तयार करण्यासाठी तुम्ही यात पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात साखर टाकून पाक तयार करा.
आता एका पॅनमध्ये तूप टाकून जिलेबी तळण्यासाठी ठेवा.
जलेबी तळून झाल्यावर साखरेच्या पाकात छान बुडवून घ्या.