Vishal Gangurde
पुण्यात होळीसाठी झाडे तोडल्यास १ लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.
पुणे पालिकेकडून झाडे तोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
पुणे शहरातील वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे तोडीवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
होळीनिमित्त अनेक ठिकाणी लाकडांचा वापर केला जातो.
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, झाडे तोडणे हा दंडात्मक गुन्हा आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सुद्धा झाडे तोडणाऱ्या व्यक्तींकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करणार आहे.