Vishal Gangurde
अनेकांना मऊ लुसलुशीत चपात्या आवडतात. तर काही जणांच्या चपात्या या काळ्या कडक होताना दिसतात.
पीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पीठ न चाळता वापल्याने चपात्या कडक होतात. तसेच चपात्या मऊ होत नाही.
चपात्या मऊ बनवण्याासाठी पिठात थोडे तूप घाला. त्यानंतर पीठ मळून घ्या. त्यामुळे पीठ खूप मऊ होईल. तेल वापरणे टाळा.
चपात्या मऊ बनवण्यासाठी पीठ मळून घेणे फायदेशीर ठरते. पीठ मळत असताना थोडे थोडे पाणी घालून पीठ तयार करून घेणे.
मळलेलं पीठ जास्त वेळ उघडे ठेवल्याने काळे पडते. त्यामुळे अशा पीठापासून तयार केलेल्या चपात्या काळ्या होऊ लागतात. त्यामुळे पीठ जास्त वेळ उघडे ठेवू नका.
चपात्या साठवण्यासाठी सुती कापडाचा वापर करा. सुती कपडा ओलावा शोषून घेतो, त्यामुळे चपात्या अधिक वेळ सुरक्षित ठेवण्यास मदत होते.