Shraddha Thik
होळी खेळताना रंग तोंडात, कानात किंवा डोळ्यात जातो. काही उपाय ताबडतोब न केल्यास ते घातक ठरू शकते.
रंग पोटात गेला तर काय होईल असा प्रश्न लोकांना पडतो. रंगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे देखील जाणून घ्या.
होळीचा रंग चुकून कोणाच्या डोळ्यात गेला तर लगेच थंड पाण्याने धुवावे.
थंड पाणी शिंपडल्यानंतरही जळजळ होत असेल तर गुलाबपाणी वापरा. गुलाब पाण्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.
रंग लागल्यानंतर चुकूनही डोळ्यांना बर्फ चोळू नका, कारण असे केल्याने खाज किंवा जळजळ वाढू शकते.
होळीचे रंग कानात गेल्यास संसर्गाचा धोका वाढतो. होळी खेळताना चुकून कोरडा रंग कानात गेला तर लगेच खाली वाका.
रंग काढल्यानंतरही कानात दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.