लघवी रोखून ठेवण्याची सवय किडनीसाठी धोकादायक? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Manasvi Choudhary

लघवी रोखून धरण्याची सवय

कामामध्ये बिझी राहल्यामुळे किंवा प्रवासामुळे लघवी थांबवून ठेवली जाते. पण तुम्हाला माहितीये का? लघवी थांबून ठेवण्याची ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Holding in Urine | pinterest

आरोग्यावर होणारे धक्कादायक परिणाम

लघवी रोखून धरण्याचे आरोग्यावर होणारे कोणते घातक परिणाम आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Do not hold in urine | pinterest

युरीनेरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

लघवी बराच वेळ रोखून धरल्यामुळे मूत्राशयात बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. यामुळे वारंवार जळजळ होणे, पोटात दुखते ज्याचा थेट त्रास किडनीपर्यंत पोहोचू शकतो.

Urinary Tract Infection (UTI)

किडनी स्टोनचा धोका

लघवीमध्ये कॅल्शियम, यूरिक ॲसिड आणि इतर मिनरल्स असतात. जर तुम्ही नियमितपणे लघवी रोखून धरली, तर हे घटक मूत्राशयात किंवा किडनीमध्ये जमा होऊन खडे तयार होतात.

Risk of Kidney Stones | pinterest

मूत्राशयाचे स्नायू कमजोर होणे

मूत्राशय एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लघवी साठवून ठेवू शकते. पण ती सतत दाबून ठेवल्याने मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमजोर होतात.

Weakened Bladder Muscles | saam tv

किडनी फेल्युअर किंवा संसर्ग

जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे मूत्राशयावर अतिरिक्त ताण येतो यामुळे किडनीवर दाब पडतो

Kidney Failure / Infection | saam tv

ओटीपोटात तीव्र वेदना आणि सूज

लघवी रोखल्यामुळे पोटाच्या खालच्या भागात आणि पाठित तीव्र कळा किंवा वेदना होऊ शकतात. तसेच शरीरातील विषारी घटक योग्य वेळी बाहेर न पडल्यामुळे संपूर्ण शरीरावर सूज येऊ शकते.

Severe Abdominal Pain | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Silk Saree: महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, या 8 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Silk Saree
येथे क्लिक करा...