Surabhi Jayashree Jagdish
दिल्लीतील मेहरौली भागात असलेला कुतुब मीनार हा भारतातील सर्वात उंच आणि जगातील सर्वात भव्य विटांनी बांधलेला मनोरा आहे. ही ऐतिहासिक वास्तू आपल्या भव्यतेमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते.
भारतीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याची ओळख आहे. कुतुब मीनार हा भारतीय वास्तुकलेच्या सुंदर संगमाचं प्रतीक मानला जातो.
कुतुब मीनारच्या बांधकामाची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबक यांनी इ.स. 1199 मध्ये केली होती.
त्यांनी या मीनारचा फक्त पहिला मजला बांधून पूर्ण केला. याच काळात या भव्य वास्तूची पायाभरणी झाली.
ऐबक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई इल्तुतमिश यांनी काम पुढे चालू ठेवले. त्यांनी आणखी तीन मजले जोडून मीनार चार मजली बनवला. यामुळे या वास्तूची उंची आणि भव्यता अधिक वाढली.
इ.स. 1369 मध्ये वीज पडल्यामुळे मीनारच्या वरच्या भागाचं नुकसान झालं होतं. या घटनेमुळे मीनारच्या रचनेवर परिणाम झाला. त्या काळात ही एक मोठी आपत्ती मानली गेली
फिरोज शाह तुघलक यांनी मीनारची दुरुस्ती करून घेतली. त्यांनी एक अतिरिक्त पाचवा मजलाही बांधून पूर्ण केला. यामुळे कुतुब मीनारला आजचे संपूर्ण स्वरूप मिळाले.
या मीनारचे नाव सूफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या सन्मानार्थ ठेवलं गेलंय. ७२.५ मीटर उंच असलेला हा मीनार सुंदर नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. इ.स. 1993 मध्ये युनेस्कोने तिला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.