Manasvi Choudhary
जेवणासोबत लोणचे खायला सर्वांनाच आव़डते. लोणचे जेवणाची चव आणखी वाढवते.
पारंपारिक पद्धतीचं घरी बनवेल्या लोणचे अधिक चविष्ट असते.
आज आम्ही तुम्हाला घरगुती स्टाईलचं हिरव्या मिरचीचे लोणचे रेसिपी सांगणार आहोत.
हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी हिरवी मिरची, तेल, लिंबू, मीठ, काळी मोहरी, बडीशेप, मेथी दाणे, जीरे, काळी मिरी, ओवा, मीठ, हिंग, हळद हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवा आणि त्या पूर्णपणे कोरड्या करा. मिरचीचे देठ काढून त्या कोरडे करून घ्या.
लोणचे मसाला बनवण्यासाठी एका कढईत गरम तेलामध्ये मेथी दाणे, मोहरी, हिंग आणि हळद हे मसाले परतून घ्या.
मसाला थंड झाल्यावर त्यात हिरव्या चिरलेल्या मिरच्या, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा. सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि एका स्वच्छ डब्यामध्ये हे लोणचे भरा.
लोणचे तयार झाले की मुरण्यासाठी बाजूला ठेवावे. काहीवेळातच तुमचा हिरवी मिरचीचा लोणचा तयार असेल .