Siddhi Hande
रोज जेवणासोबत काहीतरी तोंडी लावायला लागते. काहीतरी झणझणीत चटणी किंवा ठेचा असेल तर जेवायला आणखी मज्जा येते.
तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा अवघ्या ५ मिनिटात बनवू शकतात. याची रेसिपी खूप सोपी आहे.
हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, शेंगदाणे, जिरे,तेल, मीठ, लिंबाचा रस
सर्वात आधी तुम्हाला कढईत थोडं तेल गरम करायचं आहे. त्यात मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे.
यानंतर भाजलेले मिश्रण थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर खलबत्त्यात मिश्रण जाडसर कुटून घ्या.
कुटलेल्या मिश्रणात थोडं मीठ, जिरे आणि कोथिंबीर टाकून परतून घ्या.
यानंतर तुम्ही ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतात.
ठेचा जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो जास्त वेळ परतून घ्या.