Manasvi Choudhary
आयुर्वेदात, स्वयंपाकघरातील मसाल्यांना विशेष महत्त्व आहे. यापैकी गुणकारी मसाला म्हणजे हिंग.
हिंग केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
दररोज चिमूटभर हिंगाचे सेवन केले तर शरीराला कोणते फायदे होतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
हिंग शरीरात पाचक रसांचे स्त्राव वाढवण्यास मदत करते यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचते.
जेवणानंतर तुम्हाला वारंवार पोटफुगी, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून प्या.
पोटाशी संबंधित विविध समस्यांवर हिंग प्रभावी उपाय आहे. पोटात गोळा येणे, पोटात कळा मारणे किंवा वाताचा त्रास दूर करण्यासाठी हिंग फायदेशीर आहे.
हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कफ किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हिंग पाण्यात किंवा मधात टाकून प्या.
हिंगाचे नियमित सेवन केल्याने शरीराचे मेटाबोलिज्म सुधारते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि वजन नियंत्रणात राखण्यास मदत मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.