Manasvi Choudhary
महाराष्ट्रीयन संस्कृतीत लग्नात मुंडावळ्यांना विशेष महत्व आहे. लग्नात नवरा नवरी यांना मुंडावळ्या बांधल्य जातात.
फार पूर्वीपासून लग्नात मुंडावळ्या बांधण्याची जुनी परंपरा आहे. सध्या मुंडावळ्याच्या अनेक डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत.
मोत्याच्या पांढऱ्याशुभ्र मुंडावळ्या कायमच ट्रेडिंगमध्ये असतात. अस्सल पारंपारिक लूकसाठी या मुंडावळ्या तुम्ही निवडू शकता.
सध्या वधूच्या लाल किंवा मरून रंगाच्या साडीला मॅचिंग म्हणून कुंदन आणि लाल खड्यांच्या मुंडावळ्या तुम्ही निवडू शकता.
अस्सल सोन्यासारख्या दिसणाऱ्या या मुंडावळ्या तुम्ही निवडू शकता. हलक्या आणि टिकायला मजबूत या मुंडावळ्या रिच लूक देतात.
हळदीच्या कार्यक्रमासाठी किंवा 'इको-फ्रेंडली' मुंडावळ्या तुम्ही निवडू शकता. ओरिजनल पांढऱ्या फुलांच्या या मुंडावळ्या असतात.
ज्यांना खूप जड दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी मोत्यांची एकच नाजूक मणी असलेलं मुंडावळ्या बेस्ट आहेत.