Sadesati | साडेसाती कधी संपते? इतके टप्पे असतात...

Shraddha Thik

साडेसाती

शास्त्रानुसार शनिच्या साडेसातीमध्ये काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो आणि काही प्रमाणात त्रासांपासूनही सुटका मिळते.

Sadesati | Yandex

ज्योतिष शास्त्रात

शनिदेवाला कर्म दाता म्हणतात, आणि त्यामागचे कारण असे आहे की शनि देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.

shani Sadesati | Yandex

साडेसातीचा काळ

हा माणसाची परीक्षा घेतो आणि त्याला साडेसात वर्षे त्रासासोबत शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.

Sadesati types | Yandex

तीन टप्पे

साडेसातीचे तीन टप्पे असतात ते कोणते आहेत आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते ते जाणून घेऊयात.

Sadesati time | Yandex

उदयावस्था

शनीची साडेसतीची ही पहिली अवस्था आहे, त्याचा प्रभाव अडीच वर्षांपर्यंत दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार या चरणात व्यक्तीच्या डोक्यावर शनिदेव वास करतात आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Sadesati upay | Yandex

मध्यचरण

हा टप्पा शनि महाराजांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आहे, या टप्प्याला मध्य चरण असेही म्हणतात. त्याची मुदत एकूण अडीच वर्षांची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात. शनीची साडेसतीची ही अवस्था माणसाची कठीण परीक्षा घेते. या काळात माणसाला खूप मेहनत करावी लागते.

Sadesati 3 time types | Yandex

अस्त चरण

हा शनि महाराजांचा शेवटचा आणि तिसरा चरण आहे. इतर दोन टप्प्यांप्रमाणे, हे देखील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होते. शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा माणसाच्या पायावर परिणाम करतो. या काळात व्यक्तीला थोडा आराम मिळतो. तरीही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो.

shani Sadesati upay | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

disclaimer | Yandex

Next : Yoga Benefits | शलभासनाचे आहेत आरोग्याला आश्चर्यकारक फायदे!

येथे क्लिक करा...