Shreya Maskar
येणाऱ्या शुक्रवारी (12 सप्टेंबर 2025) तीन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. चाहते चित्रपटांसाठी उत्सुक आहेत.
'बिन लग्नाची गोष्ट 'या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार आहेत. ही एक प्रेमकथा आहे.
'आरपार' चित्रपटातून ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची गाणी खूपच गाजत आहे.
'दशावतार' चित्रपटात मराठी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या चित्रपटातील लूकची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी (12 सप्टेंबर 2025) तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मनोज बाजपेयी 'जुगनुमा' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम रेड्डी यांनी केले आहे.
'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपटात अवनीत कौर आणि शांतनु माहेश्वरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही एक लव्ह स्टोरी आहे.
'मन्नू क्या करेगा?'चित्रपटात राजेश कुमार, विनय पाठक आणि साची बिंद्रा हे कलाकार असून चित्रपटाचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे.