हायवेवर दिसणाऱ्या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषांचा अर्थ माहितीये का?

Manasvi Choudhary

रस्त्यावरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा

रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा अनेकदा पाहिल्याच असतील.

Road Line Meanings

मुख्य हेतू

अनेकांना असे वाटते की या रेषा रस्त्याच्या सजावटीसाठी आहेत मात्र तसे नाही रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि नियंत्रणासाठी या रेषा असतात.

Yellow Line Traffic Rules

हे संकेत देतात

रस्त्यावरील या रेषा म्हणजे जे चालकाला गाडी चालवताना काय करावे आणि काय करू नये याचे थेट संकेत देतात.

Highway Driving Safety

सलग पिवळी रेषा

रस्त्याच्या मधोमध असलेली पिवळी रेषा म्हणजे तुम्ही दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही. तुम्हाला तुमच्याच लेनमध्ये वाहन चालवायचे आहे.

Solid Yellow Line

दुहेरी पिवळी रेषा

रस्त्यावर दोन सलग पिवळ्या रेषा एकत्र दिसत असतील, तर तिथून ओव्हरटेक करणे किंवा यू-टर्न घेऊ शकत नाही. हा नियम मोडल्यास अपघात होण्याची शक्यता असू शकते.

Double Solid Yellow Lines

सलग पांढरी रेषा

रस्त्यावरील सरळ पांढऱ्या रेषेचा अर्थ म्हणजे तुम्ही एकाच लेनने प्रवास करू शकता. अशा रस्त्यावर तुम्हाला लेन बदलण्याची परवानगी नसते.

Solid White Line

तुटक पांढरी रेषा

रस्त्यांवर तुटक पांढऱ्या रंगाची रेषा असते म्हणजे तुम्ही गरजेनुसार तुमची लेन बदलू शकता, तसेच योग्य सावधगिरी बाळगून आणि इंडिकेटर देऊन ओव्हरटेकही करू शकता.

Broken White Line

दुहेरी पांढरी रेषा

जेव्हा रस्त्यावर दोन समांतर सलग पांढऱ्या रेषा असतात, तेव्हा तिथे लेन बदलण्यास पूर्णपणे मनाई असते. तुम्हाला एकाच गतीने आणि एकाच रांगेत वाहन चालवावे लागते.

Double Solid White Lines

NEXT: फोनमधल्या सिमकार्डला एका बाजूने कट का असतो? तुम्हाला माहितीये का कारण

Sim Card Design
येथे क्लिक करा...