Shruti Vilas Kadam
फोर्ब्सच्या अहवालानुसार, दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता आहे. २०२१ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'च्या यशानंतर, अल्लू अर्जुन त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये घेतो.
दुसऱ्या क्रमांकावर थलापती विजय आहे. जो एक अभिनेता तसेच एक राजकारणी आहे. विजय त्याच्या एका चित्रपटासाठी १३० ते २७५ कोटी रुपये घेतो.
तिसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आहे. जो १५० कोटी ते २५० कोटी रुपये मानधन घेतो.
सुपरस्टार रजनीकांतची एकूण संपत्ती ४३० कोटी रुपये आहे. रजनीकांतची मानधन १२५ ते १७० कोटी रुपये आहे.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. तो एका चित्रपटासाठी १०० कोटी ते २७५ कोटी रुपये घेतो.
बाहुबलीच्या यशानंतर साउथ स्टार प्रभासचे मानधनही वाढले आहे. एका चित्रपटासाठी त्याचे मानधन १०० कोटी ते २०० कोटी रुपये आहे.
अजित कुमार देखील एका चित्रपटासाठी १०५ ते १६५ कोटी रुपये घेतो.
२९०० कोटींची एकूण संपत्ती असलेला सुपरस्टार सलमान खान महागड्या स्टार्सच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. तो एका चित्रपटासाठी १००-१५० कोटी रुपये घेतो.
कमल हासनची मानधनही १०० कोटी ते १५० कोटी रुपये आहे.
अक्षय कुमार २५०० कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. तो त्याच्या एका चित्रपटासाठी ६० कोटी ते १४५ कोटी रुपये घेतो.