Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीनुसार चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. उच्च कोलेस्ट्रॉल ही सामान्य समस्या असली तरी तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
यासाठी उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे नेमकी कोणती आहेत? ती कशी ओळखायची? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्तवाहिन्यामध्ये जमा होतं ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा झटका उद्भवू शकतो.
जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते यामुळे शरीरात रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयापर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा पोहचू शकत नाही.
तुम्हाला मेहनतीचे काम न करता सतत थकवा येत असेल तर हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे शरीराच्या विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले की पायांच्या शिरांमधील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. पायांमध्ये मुंग्या येणे, बधिरता, पाय सुन्न पडणे या समस्या उद्भवतात.
जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते तेव्हा हृदयाला अधिक मेहनत करावी लागते यामळे शारीरिक हालचाली करताना धाप लागू शकतो. थोडेजरी चाललो, धावलो की श्वास घ्यायला त्रास होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.