Shraddha Thik
हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी 1 समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.
या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो.म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.
रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा.
मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
नियमित चालणे हा व्यायाम केलात तरी अनेक आजारांपा- सून दूर राहू शकता.थोडक्यात फिजिकली अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
वाढणारे वजन उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी त्रासदायक बाब आहे.त्या मुळे वेळीच आहार,व्यायामात बदल करून अतिरिक्त चरबी घटवा.
मानसिक धक्का बसेल/ तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. आवडत्या छंदामध्ये, योगाभ्यासामध्ये मन रमवा.