Manasvi Choudhary
भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. चहा प्यायल्याने मूड फ्रेश होतो.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण, अतिप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यावर परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी चहा प्यावा की नाही?
चहामध्ये कॅफिनमुळे रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता असते. जास्त साखर आणि दुधातील फॅट्समुळे वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास उद्भवू शकतो.
रिकाम्या पोटी किंवा अति प्रमाणात चहा घेतल्यास गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो पोटाचे विकार उद्भवतात.
चहामधील कॅफिनमुळे हाय बीपीचा रुग्ण चहा पिणे टाळावे कारण कॅफिनमुळे शरीरातील रक्तदाब अचानक वाढू शकतो रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.