High Blood Pressure Diet Tips: तुम्हालाही हाय बीपीचा त्रास आहे? मग काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

उच्च रक्तदाबाची समस्या

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या बनली आहे. उच्च रक्तदाबाकडे वेळीच लक्ष न दिल्यास तुम्हाला हार्ट अटॅक धोका संभावतो.

High Blood Pressure | pinterest

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घ्या

रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचारासोबतच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

High blood pressure | pinterest

हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी काय खावे, काय टाळावे?

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आपल्या आहारात नेमके काय खावे आणि काय खाणे टाळावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

high blood pressure tips

फळे आणि भाज्या

केळी, संत्री, डाळिंब, पालक आणि रताळे यांमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे शरीरातील सोडिअमचा प्रभाव कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Fruits and vegetables | pinterest

हिरव्या पालेभाज्या

मेथी, पालक, तांदुळजा यांसारख्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

Green Leafy Vegetables | yandex

ड्रायफ्रूट्स आणि बिया

बदाम, अक्रोड, जवस आणि सूर्यफूलाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते

seeds and nuts | pintrest

लसूण

लसणाचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या नॉर्मल राहण्यास मदत होते.

Garlic | yandex

हाय बीपीच्या रुग्णांनी काय खाऊ नये?

मिठातील सोडिअममुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. पॅकबंद अन्न, चिप्स, पापड आणि बाहेरचे खारट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

BP Reading Problem | pinterest

जंक फूड आणि फास्ट फूड

बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि मैद्याचे पदार्थ यामध्ये अनहल्दी फॅट्स आणि सोडिअमचे प्रमाण खूप जास्त असते.

Junk Food | pinterest

चहा, कॉफी घेणे टाळा

कडक दूध-साखरेचा चहा किंवा अतिप्रमाणात कॉफी पिण्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो.

Tea And Coffee

पॅकबंद आणि साठवलेले अन्न

लोणची, सॉस, केचअप आणि डबाबंद पदार्थांमध्ये टिकून राहण्यासाठी मिठाचा वापर जास्त केला जातो, जे हाय बीपीच्या रुग्णांसाठी विष समान आहे.

pickles | yandex

मद्यपान आणि धुम्रपान

दारू आणि सिगारेटमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे बीपी वेगाने वाढतो.

Alcohol | pinterest

NEXT: Healthy Breakfast Option: चहा-बिस्किटं की पोहे? नाश्त्यासाठी कोणता पर्याय बेस्ट, जाणून घ्या!

Tea- Biscuit Vs Poha Healthy Breakfast Option
येथे क्लिक करा..