ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईच्या जवळच खूप सुंदर निसर्गरम्य स्थळे आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही एक दिवसीय ट्रीप करु शकतात.
विरार हे ठिकाण फिरण्यासाठी खूप सुंदर आहे. तेथे समुद्र, निसर्गरम्य स्थळे पाहण्यासारखी आहेत.
विरारमधील जिवदानी मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. गुरुवारी या मंदिरात खूप जास्त गर्दी असते. एका डोंगरावर हे मंदिर वसलेले आहे.
विरारपासून काही अंतर दूर असलेले वज्रेश्वरी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथील पुरातन आणि पारंपारिक वास्तू पाहण्यासारखे आहे.
विरारमधील अर्नाला बीच हा खूप सुंदर बीच आहे. फॅमिली टाइम घालवण्यासाठी ही खूप चांगली जागा आहे.
राजोडी बीच हा विरार आणि वसईच्या मध्ये आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स खेळू शकतात.
वीकेंडला जाण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे विसावा वॉटरपार्क, विरारमधील या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये खूप राईड्स आहेत.