Sakshi Sunil Jadhav
दादर हे ठिकाण मुंबईकरांसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ईथे तुम्हाला समुद्र किनाऱ्यापासून देव दर्शनापर्यंत सगळ्याच ठिकाणी फिरता येईल.
प्रभादेवीजवळ मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिर तुम्ही पाहू शकता. हे दादरपासून फक्त १०-१५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
माहिम दर्गा हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. दादरपासून महिमपर्यंत सहज पोहोचता येते.
मुंबईतील सर्वात मोठे मैदान म्हणजे शिवाजी पार्क आहे. सकाळच्या फेरफटक्यासाठी आणि इतिहासाची झलक पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
वरळी सीफेसजवळ सुंदर समुद्रकिनाऱ्याचे वातावरण आणि सीलिंकचा अप्रतिम नजारा पाहू शकता.
समुद्राच्या मध्यभागी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. ईथे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी वेगळाच अनुभव येईल.
विज्ञान, अंतराळ आणि कला यांचे आकर्षक प्रदर्शन पाहण्यासाठी नेहरू सायन्स सेंटर हे बेस्ट ठिकाण आहे.
हँगिंग गार्डन हे हिरवाईने नटलेले गार्डन आहे. फॅमिली ट्रिपसाठी आणि पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे.