Shreya Maskar
अधूनमधून येणाऱ्या उचक्या सामान्य असल्या तरी, वारंवार येणाऱ्या उचक्या अनेकदा शारीरिक, पचनसंस्थेच्या किंवा मज्जासंस्थेच्या समस्याचे कारण असते.
उचक्या येणे धोकादायक बाब नाही, परंतु जर त्या ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्या, तर त्यांना 'सतत येणाऱ्या उचक्या' (persistent hiccups) मानले जाते. तेव्हा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दीर्घकाळ उचकी लागण्याची काही कारणे जाणून घ्या.
पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत आल्याने वारंवार उचकी लागते. हे आम्ल अन्ननलिकेच्या अस्तराला त्रास देऊन डायफ्राम (श्वासोच्छवासाचे स्नायू) मध्ये आकुंचन निर्माण करते.
मज्जासंस्थेचे विकार हे देखील वारंवार उचकी येण्यामागचे कारण असू शकते. जेव्हा मज्जासंस्थेमध्ये काही समस्या निर्माण होते, तेव्हा डायाफ्राम (छाती आणि पोटाच्या मधील स्नायू) नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होतो आणि उचकी सुरू होते.
नसांचे नुकसान किंवा जळजळ होत असेल, गाठ असेल तर दीर्घकाळ उचकी लागू शकते. मानवी शरीरात छाती आणि पोटाच्या मध्ये असणाऱ्या 'डायाफ्राम' या स्नायूच्या आकुंचनामुळे उचकी येते.
मधुमेह, इलेक्ट्रोलाइट असंतुलन (जसे की कमी सोडियम किंवा कॅल्शियम) संपूर्ण शरीरातील मज्जातंतू आणि स्नायूंच्या संदेशवहनात बदल घडवू शकतात, ज्यामुळे उचकी लागते.
तीव्र तणाव, तीव्र चिंता, दुःख यांमुळे डायफ्रामच्या आकुंचनावरील मेंदूच्या नियंत्रणात व्यत्यय आणतात, ज्यामुळे उचकी सुरू होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.