Shreya Maskar
जास्वंदीच्या फुल-पानांचा हेअर मास्क बनवण्यासाठी जास्वंदीची फुले- पाने, कढीपत्ता, दही, कोरफड गर आणि गुलाब पाणी इत्यादी साहित्य लागते.
जास्वंदीच्या फुल-पानांचा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात जास्वंदीची फुले- पाने, कढीपत्ता, दही, कोरफड गर वाटून पेस्ट बनवा.
जाडसर पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात दोन थेंब गुलाब पाणी टाका.
हेअर मास्क लावल्यावर १५-२० मिनिटांनी केस धुवावे.
जास्वंदीच्या फुल-पानांचा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा केसांना लावा.
हेअर मास्क लावल्याने टाळू थंड राहतो आणि केसगळती कमी होते.
केस चमकदार, लांब, दाट होतात.
केसांतील कोंडा आणि टाळूची घाण निघून जाते.