Shraddha Thik
मुलं कितीही खातात तरी अंगाला लागत नाही. बारीक दिसतात त्यांची उंची वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ही योगासने करून मुलांची उंची वाढवण्यासाठी मदत करण्यात मदत करू शकता.
मुलांची उंची कमी असेल आणि तुम्हाला मोठे झाल्यानंतरही त्यांची उंची कमी राहील अशी भिती असेल तर काही योगासनांची मदत घेऊन तुम्ही हाईट वाढवू शकता.
चक्रसान केल्याने हाईट तर वाढतेच पण शरीराची लवचीकतासुद्धा वाढते.
मुलांसाठी ताडासन करणं प्रभावी मानलं जातं. ताडासन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभं राहा. त्यानंतर दोन्ही पायाचे पंजे आणि टाचा चिटकवून उभं राहा. त्यानंतर हात एकत्र जोडून शरीर वरच्या बाजूला खेचा.
रोज हे योगासन केल्यानं शरीर व्यवस्थित स्ट्रेच होते. यामुळे उंचीही वाढते.
धनुरासन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि पचनक्रियाही चांगली राहते. शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढून उंची वाढण्यासही मदत होते.
वृक्षासन केल्याने पाय आणि हातांचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.