Manasvi Choudhary
'कर्करोग' हा गंभीर जिवघेणा आजार आहे. महिलांमध्येही कर्करोग आजार उद्भवतो. महिलांमध्ये कर्करोग हा शरीराच्या स्तन, गर्भाशय, योनीद्वार आणि अंडाशय या अवयवांना लक्ष्य करतो.
महिलांनी कर्करोग होणाच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास या गंभीर आजारावर उपचार करणे शक्य होते. यासाठी महिलांना कर्करोगाच्या लक्षणे कोणती आहेत ती माहित असणे महत्वाचे आहे.
स्त्रीच्या प्रजनन अवयवांमधील पेशींची वाढ असमान्यपणे होते तेव्हा गर्भाशय कर्करोग, अंडाशय कर्करोग, योनीचा कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या आरोग्याकडे आणि मासिक पाळीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र योनीतून होणारा अति रक्तस्त्राव हे केवळ सामान्य इन्फेक्शन नसून 'व्हल्व्हार' किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. यासाठी महिलांनी योनीतून होणारा रक्तस्त्राव किती प्रमाणात जाणे योग्य आहे? हे समजून घेणे महत्वाचे आहे.
दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव: जर तुमची मासिक पाळी सात दिवसांपेक्षा जास्त दिवस येत असेल.
वारंवार पॅड बदलावा लागणे: रक्तस्त्राव इतका जास्त असेल की दर दोन तासांपेक्षा पॅड बदलावा लागत असेल.
रक्ताच्या गुठळ्या जाणे: रक्तस्त्रावा दरम्यान रक्ताच्या गुठळ्या पडत असतील.
अती थकवा आणि अशक्तपणा: अतिरक्तस्त्रावामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊन श्वास घेण्यास त्रास होणे, सतत थकवा येणे
ओटीपोटीत सतत वेदना: मासिक पाळीच्या दरम्यान किंवा इतर दिवसांतही ओटीपोटात सतत तीव्र वेदना होणे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.