ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राज्यात सध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होतो.
उन्हाळ्यात नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
ऊन सर्वात जास्त डोक्याला लागते. त्यामुळे डोक्यावर टोपी, ओढणी, रुमाल किंवा छत्री ठेवावी.
उन्हाळ्यात सुती आणि सैल कपडे घालावेत. जेणेकरुन जास्त घाम येणार नाही.
तीव्र उन्हाचा त्रास डोळ्यांना होतो. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी सनग्लासेस लावावेत.
उन्हाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामुळे टायफॉईड, कावीळ यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी प्यावे. पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे.
उन्हाळ्यात जर तुम्हाला लघवी करताना वेदना, मळमळ, उलट्या होत असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जा.
ही लक्षणे किडणी स्टोनची आहेत. किडनी स्टोनमुळे खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.