Heart Patient Walking: हार्ट पेशंट्सनी रोज किती पावले चालावे? जाणून घ्या चालण्याचे फायदे आणि घ्यायची काळजी

Shruti Vilas Kadam

सुरुवातीला किती पावले चालावीत?

हार्ट पेशंट्स असलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला आपल्या क्षमतेनुसार कमी अंतर चालावे. काही व्यक्ती ५ ते १० मिनिटांच्या हलक्या चालण्यापासून सुरुवात करू शकतात. मात्र, अलीकडेच हृदयविकाराचा झटका आला असल्यास किंवा शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Heart Patient Walking | google

दररोज १० हजार पावले चालणे गरजेचे आहे का?

नाही. हार्ट पेशंट्स असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी १० हजार स्टेप्स चालणे योग्य असेलच असे नाही. आपल्या सध्याच्या हालचालींच्या क्षमतेनुसार हळूहळू स्टेप्स वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे.

Heart Patient Walking | PINTREST

चालण्याचा वेग कसा असावा?

सुरुवातीला हळू चालावे. चालताना सहज बोलता येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, डॉक्टरांनी व्यायाम करायचा सांगितले असेल तर त्यावर थोडा व्यायामासोबत चालण्याकडेही लक्ष द्यावं

Heart Patient Walking | pinterest

एकाच वेळी चालावे की ब्रेक घेऊन

एकाच वेळी जास्त वेळ चालण्याऐवजी दिवसभरात थोडं थोडं चालत राहाणं जास्त योग्य. उदाहरणार्थ, डॉक्टरांनी परवानगी दिल्यास ५ ते १० मिनिटे चालून सुरुवात करता येईल. थकवा जाणवल्यास विश्रांती घ्यावी आणि हळूहळू वेळ वाढवावा.

Heart Patient Walking

चालण्यामुळे हृदयाला काय फायदे होतात?

नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच स्टॅमिना वाढवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.

Heart Patient Walking | saam tv

ही लक्षणे दिसल्यास चालणे कमी करा

छातीत दुखणे किंवा जड वाटणे, खूप धाप लागणे, चक्कर येणे, थंड घाम येणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित चालणे थांबवा. छातीत तीव्र वेदना जाणवल्यास तातडीची वैद्यकीय मदत घ्या.

Heart Patient Walking | PINTREST

चालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?

हृदयविकाराचा प्रकार, औषधे आणि शारीरिक क्षमता यानुसार व्यायामाचे प्रमाण बदलते. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

Heart Patient Walking

Katrina Kaif: कतरिना कैफच्या नव्या लूकवर चाहते फिदा! बॉडी शेमिंग करणाऱ्यांना अभिनेत्रीने दाखवला आरसा

Katrina Kaif | Saam Tv
येथे क्लिक करा