Shreya Maskar
पहिल्या हार्ट अटॅकनंतर, पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्या.
हृदयासंबंधित सर्व औषधे, रक्त पातळ करणारी औषधे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती कधीही थांबवू नका किंवा बदलू नका.
तुमच्या हृदयाच्या सुधारणेवर लक्ष ठेवण्यासाठी हृदयरोगतज्ञांकडून रूटिंग चेकअप करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रूटिंग चेकअप फॉलो करा.
तंबाखू, सिगारेट पूर्णपणे टाळा. हृदयविकाराच्या झटक्यानंतर धूम्रपान सोडणे, हा तुमच्या प्रकृती सुधारण्यास मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
मीठ आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण कमी करून ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांवर लक्ष केंद्रित करा.
पहिल्या काही आठवड्यांमध्ये विश्रांती घ्या, त्यानंतर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हळूहळू हलका एरोबिक व्यायाम सुरू करा.
तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.