Shreya Maskar
मीठ हे हॉर्ट अटॅकच्या संबंधित सर्व आजारांचा मोठा शत्रू आहे. त्यामुळे मीठाचे प्रमाण वेळीच कमी करा आणि आरोग्य जपा.
अतिरिक्त सोडियम तुमच्या शरीरात पाणी धरून ठेवते. यामुळे तुमच्या रक्ताचे एकूण प्रमाण वाढते. जास्त मिठाचे सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो.
वाढलेल्या रक्ताच्या प्रमाणामुळे तुमच्या धमन्यांच्या भिंतींवर अतिरिक्त दाब येतो. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.
उच्च दाब आणि मीठाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे तुमच्या धमन्यांना इजा होऊ शकते आणि त्या कठीण होऊ शकतात, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो.
सततच्या जास्त कार्यभारामुळे हृदयाचे स्नायू जाड किंवा मोठे होऊ शकतात, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतात, ज्यामुळे हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो.
प्रक्रिया केलेले पदार्थ, पापड, लोणचे, सॉस, पॅकेज फूड यांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांचे सेवन टाळा.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे फळे, भाज्या कडधान्ये यांचे सेवन करा. पॅकेज फूड खाताना त्यातील मीठाची मात्रा तपासा आणि मगच मर्यादित स्वरुपात खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.