Shreya Maskar
आजकाल प्रत्येक दुसऱ्या घरात हार्ट आणि बीपीचे रुग्ण आढळतात. त्यांच्या रोजच्या जीवनातील एक चूक हाय बीपी आणि हार्ट अटॅक कारणीभूत ठरते, ती म्हणजे सिगारेट आणि मद्यपान करणे.
सिगारेट आणि मद्यपान दोघांमुळेही उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यांचे धोका वाढतो. मात्र जास्त आरोग्यास घातक काय जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सिगारेट तुमच्या हृदयासाठी जास्त घातक ठरते. जास्त प्रमाणात धूम्रपान केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी गंभीर नुकसान होते.
सिगारेटमधील निकोटीन तुमचा रक्तदाब आणि हृदयाची गती वाढवते. विषारी रसायनांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
धूम्रपान केल्याने तुमचे रक्त चिकट होते, ज्यामुळे घातक गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच धूम्रपान करणे सोडा किंवा कमी करा.
तसेच जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. जास्त मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
धूम्रपान आणि मद्यपान एकाच वेळी करत असाल तर ते आरोग्यास जास्त घातक ठरते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते आणि तुम्हाला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.