Heart Attack : जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण वाढतंय, जीव वाचवण्यासाठी 'या' ५ सवयी आताच सोडा

Shreya Maskar

हार्ट अटॅकमुळे मृत्यू

जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोजच्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून तुम्हाला हृदयविकाराचा झटक्याचा धोका टाळता येतो किंवा कमी करता येतो.

Heart Attack | pinterest

धूम्रपान-मद्यपान

आजकाल धूम्रपान-मद्यपान करणे ही फॅशन मानली जाते. मात्र यामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते, रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

Smoking-drinking | pinterest

उच्च रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हृदयाचे कार्य बिघडते. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, उच्च रक्तदाबावर नियमित लक्ष ठेवण गरजेचे आहे.

High blood pressure | pinterest

मधुमेह

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, त्यामुळे मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी कायम ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवावे.

Diabetes | pinterest

कमी झोप

रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. जर तुम्हाला दररोज ७ तासांपेक्षा कमी झोप मिळत असेल, तर त्यामुळे रक्तदाब आणि तणाव दोन्ही वाढतात. शिवाय, अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील दाह (सूज) देखील वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला नुकसान पोहोचू शकते.

less sleep | pinterest

तणाव

सततचा तणाव हे हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे. कॉर्टिसोलची (तणाव संप्रेरक) उच्च पातळी हृदय , रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर दबाव आणते. नियमित व्यायामाने आपले मन शांत करण्याचा आणि तणावाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करा.

stress | pinterest

प्रक्रिया केलेले पदार्थ -अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स

मीठ आणि अतिरिक्त साखर जास्त असलेले पॅकबंद पदार्थ खाणे आताच बंद करा. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते.

Processed Foods | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...