Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Shreya Maskar

छातीत अस्वस्थता

जर अचानक छातीत तीव्र अस्वस्थता किंवा दाब जाणवत असेल, तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. तुम्हाला अधूनमधून छातीत घट्टपणा, दाब, जडपणा, जळजळ जाणवत असेल आणि ती थोड्या वेळाने कमी होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका.

Chest Discomfort | pinterest

धाप लागणे

तुम्हाला थोड्याशा हालचालीनेही धाप लागत असेल, चालताना बोलताना धाप लागत असेल किंवा पायऱ्या चढतानाही धाप लागत असेल तर हे देखील गंभीर आहे. ही समस्या विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये आढळते.

Shortness of Breath | pinterest

थकवा

तुम्हाला काहीही शारिरीक कष्टाचे काम न करता थकवा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला दैनंदिन कामे करतानाही तुमचे शरीर प्रतिसाद देत नसेल तर हे हृदयासंबंधी आजाराचे लक्षण आहे.

Fatigue | pinterest

झोपेत वारंवार व्यत्यय

झोपल्यावर वारंवार जाग येत असेल किंवा पटकन झोप लागत नसेल, तर हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला महिन्यातून अनेक वेळा असे होत असेल, तर तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Frequent Sleep Disturbances | pinterest

थंड घाम

तुम्हाला थंडीतही घाम येत असेल, तर हे देखील एक लक्षण असू शकते. भूक न लागणे, चक्कर येणे किंवा वारंवार मळमळ होणे हे देखील कमकुवत हृदयाचे लक्षण आहे.

Cold Sweats | pinterest

शरीरात वेदना

हातांमध्ये, मानेत, जबड्यात, खांद्यांमध्ये किंवा पाठीत वेदना होत असतील, तर त्याला सामान्य समजू नका. ही हृदयविकाराच्या झटक्याची छुपी लक्षणे आहेत.

Pain in the Arms | pinterest

कोणाला जास्त धोका असतो?

उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल असलेले लोक, धूम्रपान करणारे आणि ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, चाळिशी ओलांडलेले लोक यांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका जास्त असतो.

blood pressure | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : डेंग्यूमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...