Priya More
शरीरामध्ये हृदयाची भूमिका खूपच महत्वाची असते. हृदय बंद पडल्यावर माणसाचा मृत्यू होतो.
हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर अनेक संकेत देतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका.
छातीत दुखते, जडपणा येतो. छातीवर दाब, घट्टपणा आणि जळजळ जाणवते.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. हृदय नीट काम करत नाही.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अनियंत्रित रक्तदाबामुळे हृदयावर ताण येतो.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हृदयाकडे रक्तप्रवाहात अडचणी येतात.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी सतत थकवा जाणवतो. हृदय योग्यरित्या काम करत नाही.
डायबिटीज असलेल्या रुग्णांना हृदयाशीसंबंधित समस्यांचा धोका वाढतो. रक्तातील साखरेची पातळी वाढते.
वजन जास्तप्रमाणात वाढते. त्यामुळे हृदयावर दबाव येतो.