Priya More
आपले शरीर जर निरोगी राहिले तर आपण आयुष्य चांगले जगू शकतो.
बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे पोट खराब होते.
तहान लागली तरी पाणी न प्यायल्यामुळे किडनी खराब होते.
सतत ताण आणि नकारात्मक विचार केल्यामुळे मनावर परिणाम होतो.
सतत फास्ट फूड खाणे आणि दारू प्यायल्यामुळे यकृत लवकर खराब होते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे हृदयावर परिणाम होऊन ते लवकर खराब होते.
सतत खूप थंड आणि तेलकट अन्न खाल्ल्यामुळे आतडे खराब होतात.
हेलफोन्सद्वारे सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे कान खराब होतात.
सतत धुम्रपान केल्याने म्हणजे सिगारेट आणि बिडी ओढल्यामुळे फुफ्फुसे निकामी होतात.
अंधारात मोबाइल किंवा लॅपटॉपच्या प्रकाशात काम केल्यामुळे डोळे खराब होतात.