Intermittent Fasting : इंटरमिटेंट फास्टिंगची कमाल! ब्लडप्रेशर, डायबिटीजसोबत हृदयही राहील निरोगी; एकदा फायदे वाचाच

Shreya Maskar

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंग ही अन्‍न सेवनाची एक वेळ ठरवून देणारी पद्धत आहे. यामध्ये दिवसभरात ठराविक तास उपवास (काहीही न खाणे) केला जातो आणि उरलेल्या काही तासांमध्ये योग्य नियोजनाने जेवण केले जाते. तुम्ही कोणते पदार्थ खातात यापेक्षा तुम्ही कधी खातात यावर ते लक्ष केंद्रित करते.

Intermittent Fasting | pinterest

वजन कमी

खाण्याची वेळ मर्यादित ठेवल्याने इन्सुलिन कमी होते आणि चरबी जाळण्यास चालना मिळते, ज्यामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.

lose weight | pinterest

मधुमेह

इंटरमिटेंट फास्टिंगमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इन्सुलिनची पातळी कमी झाल्याने आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारल्याने टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

Diabetes | pinterest

पेशींची दुरुस्ती

दीर्घकाळ उपवास केल्याने पेशी जुनी, खराब झालेली प्रथिने आणि टाकाऊ घटक काढून टाकण्यास प्रवृत्त होतात.

cell repair | pinterest

दाह कमी

उपवासामुळे दीर्घकालीन दाह कमी होतो, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे इंटरमिटेंट फास्टिंग एकदा नक्की करून पाहा.

Reduce inflammation | pinterest

हृदयाचे आरोग्य

नियमित उपवासामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हानिकारक ट्राइग्लिसराइड्स (रक्तात आढळणारी एक प्रकारची चरबी) कमी होण्यास मदत होते.

Heart health | pinterest

मेंदूचे आरोग्य

उपवासामुळे BDNF (Brain-Derived Neurotrophic Factor) सारख्या मेंदूतील संप्रेरकांना चालना मिळू शकते, ज्यामुळे चेतापेशींचे संरक्षण होते आणि एकाग्रता वाढते.

Brain health | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : जिमसाठी वेळ नाही? घरातील 'ही' २ कामं करून वजन करा कमी

Weight Loss Secrets | AI PHOTO
येथे क्लिक करा...