Shravan Somvar : श्रावण सोमवारचा उपवास 'या' लोकांनी चुकूनही करू नका, फायद्याऐवजी होईल गंभीर नुकसान

Shreya Maskar

मधुमेही रुग्ण

मधुमेहींना वारंवार जेवण आणि औषधोपचारांची गरज असते. जर आहार आणि औषधांमधील संतुलन बिघडले, तर शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी किंवा जास्त होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे या समस्या उद्भवतात.

Diabetic patients | pinterest

गर्भवती महिला

आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी गरोदरपणात महिलांनी नियमितपणे सकस आहार घेणे आवश्यक आहे. उपवास केल्याने किंवा उपवासादरम्यान आहारावर निर्बंध घातल्याने गर्भवती महिलांना आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.

Pregnant women | pinterest

नुकसान

उपासामुळे गरोदरपणात अशक्तपणा, चक्कर येणे आणि रक्तदाब कमी होणे या समस्या वाढतात. त्यामुळे, गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारचा उपवास टाळावा.

damage | pinterest

मासिक पाळी

मासिक पाळीच्या काळात उपवास केल्याने महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण येऊ शकतो. या काळात शरीर आधीच थकलेले आणि अशक्त असते, त्यामुळे उपाशी राहिल्याने किंवा कमी खाल्ल्याने स्थिती आणखी बिघडू शकते.

Menstrual cycle | pinterest

उच्च रक्तदाब

उच्च किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनीही श्रावण सोमवारचा उपवास करताना सावधगिरी बाळगावी. उपवासादरम्यान अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे रक्तदाबाच्या पातळीत असंतुलन निर्माण होते.

High blood pressure | pinterest

डॉक्टरांचा सल्ला

डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे आणि अगदी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. जे लोक आधीपासूनच रक्तदाबाची औषधे घेत आहेत, त्यांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Doctor's advice | pinterest

हृदयाचे आरोग्य

ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत किंवा ज्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी श्रावण सोमवारी उपवास करणे टाळावे. कारण उपवासामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.

Heart health | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ४६ व्या वर्षी २५ सारखा ग्लॅमरस लूक; 'ही' बॉलिवूड अभिनेत्री रोज करते फक्त १ काम, फिटनेस सीक्रेट समोर

Nargis Fakhri | SAAM TV
येथे क्लिक करा...