Shreya Maskar
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेकदा छातीत दुखणे किंवा दाब जाणवतो. हे दुखणे काही मिनिटे टिकू राहते आणि नंतर कमी होते. काही लोकांना छातीत जळजळ होते तर छाती जड वाटते.
दुखणे फक्त छातीपुरता मर्यादित न राहता, डाव्या हाताला, खांद्याला, जबड्याला, मानेला किंवा पाठीलाही पसरू शकते. शरीरात वेदना सुरू होतात.
जर तुम्हाला जास्त श्रम न करता धाप लागत असेल किंवा पायऱ्या चढल्यावर लवकर थकवा येत असेल, तर हे हृदय निकामी होण्याचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला वारंवार थंड घाम येत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय अचानक खूप जास्त घाम येत असेल, तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
तुम्हाला अचानक चक्कर येत असेल किंवा तुम्ही बेशुद्ध पडणार आहात असे वाटत असेल, तर हे हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचे लक्षण आहे.
कधीकधी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी गॅस, अपचन किंवा पोटात जळजळ यांसारखी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे सामान्य वाटू शकतात, परंतु जर ती वारंवार होत असतील आणि औषधोपचाराने आराम मिळत नसेल तर ते हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते.
रात्री अचानक जाग येणे, अस्वस्थ वाटणे आणि अंथरुणात कुशी बदलत राहणे यांसारखी लक्षणे देखील हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.