ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोसंबी हे रसाळ आणि पौष्टिक फळ आहे. मोसंबी ज्यूस शरीराला ताजेतवाने ठेवतो आणि अनेक आरोग्यदायी फायदे देतो.
मोसंबी ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते. हे व्हिटॅमिन शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मोसंबी ज्यूस सर्दी, खोकला आणि संसर्ग टाळण्यास मदत करते.
मोसंबी ज्यूस पचनासाठी खूप फायदेशीर आहे. तो बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या कमी करतो. मोसंबी ज्यूस नियमित प्यायल्यास पोट स्वच्छ राहते.
मोसंबी ज्यूसमध्ये नैसर्गिक पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. तो शरीरातील डिहायड्रेशन दूर करतो.
मोसंबी ज्यूस त्वचा उजळ आणि निरोगी ठेवतो. तो चेहऱ्यावरिल पिंपल, डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
मोसंबी ज्यूसमध्ये कॅलरी कमी असतात. मोसंबी मेटाबॉलिझम वाढवतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो.
ताजे मोसंबी घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर मोसंबी सोलून फोडी काढून मिक्सरमध्ये टाका आणि मोसंबीचा रस काढून लगेच प्या. त्यात जास्त साखर किंवा मीठ टाकणे टाळावे. आठवड्यातून 3 ते 4 वेळा सेवन केल्यास शरिराला फायदा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.