कोमल दामुद्रे
मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये नेमके काय द्यावे हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. त्यामुळे ते त्यांच्या आवडीचे पदार्थ देतात
जर तुमचे मुलं ही टिफिन खाताना नाक मुरडत असेल तर हे पर्याय ठरतील हेल्दी
दलिया उपमा बनवण्यासाठी कांदा, गाजर, मटार, सिमला मिरची आणि सोयाबीन यांसारख्या भाज्या घालून दलिया बनवू शकता. यामध्ये मॅगी मसाला देखील घालू शकता.
पोह्यांना अधिक टेस्टी आणि हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही गाजर, मटार, शेंगदाणे, काजू आणि मसाले घालून बनवू शकता.
बहुतेक मुलांना सॅण्डविच प्रचंड आवडते. अनेक भाज्या घालून आपण टेस्टी सॅण्डविच टिफीनमध्ये देऊ शकतो.
पनीर मॅश करुन आणि त्यात भाज्या घालून हा पराठा तयार करु शकतो. यातून अधिक प्रोटीन मिळते.
कांदा, टोमॅटो आणि गाजर घालून तुम्ही मुलांसाठी व्हेजिटेबल ऑम्लेट बनवू शकता. यामधून अधिक फायबर मिळेल.
ओट्स शरीरासाठी हेल्दी असतात. यामध्ये तुम्ही गाजर, मटार, सोयाबीन घालून तुम्ही मसाला ओट्स तयार करु शकता.