Skin Secrets : चाळिशीनंतरही त्वचा दिसेल तरुण अन् चमकदार, आताच लावून घ्या 'या' ५ सवयी

Shreya Maskar

उन्हापासून वाचा

पावसाळा असो वा उन्हाळा सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हलके, लांब बाह्यांचे शर्ट, पॅन्ट कपडे घाला. तसेच रुंद कडा असलेली टोपी, यूव्ही संरक्षणासह सनग्लासेस आणि वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीन यांचा वापर करा.

Sun | pinterest

सनस्क्रीन

कपड्यांनी न झाकलेल्या त्वचेच्या सर्व भागावर तुम्ही दररोज सनस्क्रीन लावले पाहिजे. काही लोक पावसाळ्यात सनस्क्रीन लावत नाही पण ते चुकीचे आहे, पावसाळ्यातही सनस्क्रीन लावणे गरजेचे ठरते.

Sunscreen | pinterest

टॅनिंग

टॅनिंगमुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व येते. त्यामुळे आपल्या स्किन केअरमध्ये टॅनिंग रिमूव्हर असायला पाहिजे. यूव्ही किरणे स्वतःचेसाठी घातक असतात.

Tanning | pinterest

चेहऱ्याचे हावभाव

चेहऱ्यावरील हावभावामुळे त्याखालील स्नायू आकुंचित होतात. जर वर्षानुवर्षे तेच स्नायू आकुंचित होत राहिले तर या रेषा कायमस्वरूपी होतात. उदा. डोळे बारीक केल्यामुळे पडणाऱ्या रेषा कमी करण्यासाठी सनग्लासेस घाला.

facial expressions | pinterest

आहार

भरपूर ताजी फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्वचेचे अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होऊ शकते. साखर किंवा इतर शुद्ध कर्बोदके जास्त प्रमाणात असलेला आहार वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने घडवून आणतो. त्यामुळे ते खाणे टाळा.

diet | pinterest

हायड्रेट रहा

त्वचा कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची त्वचा आतून ओलसर ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.

Stay hydrated | pinterest

मॉइश्चरायझर

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी, विशेषतः चेहरा स्वच्छ केल्यानंतर, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरा.

Moisturizer | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ४६ व्या वर्षी २५ सारखा ग्लॅमरस लूक; 'ही' बॉलिवूड अभिनेत्री रोज करते फक्त १ काम, फिटनेस सीक्रेट समोर

Nargis Fakhri | SAAM TV
येथे क्लिक करा...