ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अशक्त बारीक लोक वजन वाढविण्याकरिता काहीही खातात. त्याना असे वाटते की, जास्त खाल्याने वजन वाढते परंतू हा फक्त गैरसमज आहे.
जर तुम्हाला सुध्दा वजन वाढवायचे असेल तर, काहि हेल्दी फुड्सचे सेवन करा जे वजन वाढवण्यास झपाट्याने मदत करते.
वजन लवकर वाढविण्याकरिता रोज एका ग्लासात दूधा बरोबर दोन केळ्यांचे सेवन करु शकता.
मिल्कशेक हे चव आणि आरोग्याचा खजिना मानले जातात. वजन वाढवण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक बनवू शकता आणि पिऊ शकता.
बदामांमध्ये वजन वाढवण्यासाठी अनेक गुणधर्म असतात. तुम्ही ते दुधासोबत देखील घेऊ शकता.
वजन वाढवण्यासाठी बटाट्याचे सेवन करु शकता. भाजीमध्ये टाकून किंवा बटाट्याला उकडून सुध्दा खाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.